मुदतबाह्य औषधांच्या बाटल्या शेलुबाजारच्या कडेला

0
11
वाशिम, दि. 22 – जिल्ह्यातील समाजकल्याण विभागांतर्गत येणा-या वसतिगृह प्रशासनाने मुदतबाह्य औषधी वाशिम-शेलुबाजार रस्त्याच्या कडेला खोदण्यात आलेल्या खड्यामध्ये फेकून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.समाजकल्याण विभागांतर्गत चालविण्यात येणा-या वसतिगृहात विद्यार्थ्यांसाठी ‘टॉनिक’ची औषधी पुरविली जाते. विद्यार्थी संख्येनुसार या औषधीचा पुरवठा केला जातो.नियमितपणे विद्यार्थ्यांना सदर औषधी देणे बंधनकारक आहे. मात्र, त्या औषधांचे वितरण न झाल्यानेच मुदत संपलेल्या औषधांच्या बाटल्या रस्त्याच्या कडेला फेकण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.  शेलुबाजार मार्गालगतच्या एका खड्ड्यात मुदतबाह्य औषधीच्या शेकडो ‘बॉटल्स’ आढळून आल्या आहेत. या बॉटलवर ‘सोशल जस्टिस डिपार्टमेंट होस्टेल – नॉट फॉर सेल’ असे स्पष्ट लिहिलेले असल्याने सदर मुदतबाह्य औषधी समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहातील असल्याची शक्यता आहे. या औषधीची मुदत जून 2015 मध्ये संपलेली असताना, जून 2017 मध्ये ही औषधी फेकून का देण्यात आली याची चौकशी करणे गरजेचे आहे.