32.3 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ ‘नरभक्षक’ सोडून दुसराच वाघ मारल्यास खबरदार!

‘नरभक्षक’ सोडून दुसराच वाघ मारल्यास खबरदार!

0
27

नागपूर,दि.29 : नरभक्षक वाघाला सोडून दुसराच वाघ मारला गेल्यास आणि नरभक्षक वाघाने आणखी कोण्या माणसाचा जीव घेतल्यास प्रधान मुख्य वन संरक्षकांना जबाबदार धरून त्यांच्यावर आवश्यक कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला.ब्रह्मपुरी वन विभागात टी-२७ क्रमांकाच्या वाघाने दोन माणसांचे बळी घेतले. त्यामुळे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांनी शुक्रवारी आदेश देऊन या नरभक्षक वाघाला ठार मारण्याची परवानगी दिली. याविरुद्ध डॉ. जेरिल बनाईत यांनी जनहित याचिका दाखल केली.

blank