28.2 C
Gondiā
Wednesday, August 26, 2026
Home विदर्भ 4 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम पालकमंत्र्यांच्या हस्ते आज वृक्ष लागवड

4 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम पालकमंत्र्यांच्या हस्ते आज वृक्ष लागवड

0
45

गोंदिया,दि.30 : 1 ते 7 जुलै दरम्यान राज्यात 4 कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्याअंतर्गत वृक्ष लागवडीचा मुख्य शासकीय कार्यक्रम सडक/अर्जुनी तालुक्यातील सम्यक संकल्प धम्मकुटी डव्वा (पळसगाव) येथे आज 1 जुलै रोजी सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आला आहे.पालकमंत्री राजकुमार बडोले या वृक्षलागवड कार्यक्रमाचे उदघाटन करतील. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप पाटील-भूजबळ यांची उपस्थिती राहणार आहे. मान्यवरांच्या हस्ते सम्यक संकल्प धम्मकुटी जवळील डव्वा ते माणिकघाट रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड करण्यात येईल. जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन वन विभाग व सामाजिक वनीकरण विभागाने केले आहे.