जत(जि.सांगली),दि. 04- जत तालुक्यातील बाबरबस्ती (पांडोझरी) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत संख मेडिकल असोशिएसनच्या वतीने डॉक्टर्स डे चे आयोजन गेल्या शनिवारी (दि.1) ला करण्यात आले होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी संख येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे माजी वैद्यकीय अधिकारी डॉ.व्हनखंडे, डॉ .कन्नुरे आर.एम ,डॉ .दयानंद वाघोली,डॉ संभाजी जाधव ,डॉ सतिश बिरादार पाटील लँब असिस्टंट प्रशांत नरूटे, सरगर आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित विद्यार्थ्यांच्या आरोग्याची तपासणी व रक्त गट तपासणी करण्यात आली. या शिबिराला उपस्थित सर्व डॉक्टर मंडळींचे शाळा व्यवस्थापन समिती तर्फे सत्कार करण्यात आला . डॉक्टरांनी ग्रामीण भागातील व दुगर्म भागातील डॉक्टर डे निमित्त ग्रामीण भागातील शाळेतील सर्व होतकरु विद्यार्थ्यांचे रक्त गट व आरोग्य तफासणी गरजू विद्यार्थ्यांवर उपचार करुन व सामाजिक बाधिलकी जपल्या बद्दल पांडोझरी परिसरा मध्ये या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
यावेळी पावसाळ्यातील उद्भवणाऱ्या जलजन्य आजाराबाबत सतर्क राहावे, अस्वच्छेतेमुळे पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे अतिसार गँस्टो,काँलरा हे सारखे आजार पसरत असल्याने सतर्क राहण्यासह शिक्षणाबरोबर आरोग्यविषयी दक्ष राहण्याचे आवाहन डॉक्टर मंडळींनी उपस्थितांना केले. वैयक्तिक स्वच्छतेवर जास्त लक्ष देत स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहनडॉ व्हनखंडे यांनी केले. डॉ संभाजी जाधव आणि डॉ वाघोली यांनी ही समयोचित मार्गदर्शन केले. डॉ. सभाजी जाधव यांनी शाळेची गुणवत्ता भौतिक सुविधेसाठी शाळाला पाच हजारची देणगी जाहीर केली. या बद्दल शाळेतील उपक्रमशिल शिक्षक दिलीप वाघमारे यांच्या हस्ते डॉ. जाधव यांचा ज्ञान ज्योती साविञीबाई फुले विशेषांक व गुलाब पुष्प देवून सत्कार करण्यात आला . यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजाराम गडदे, व मारूती बाबर, गोंविंद कोकरे,संगाप्पा कोरे,विठ्ठोबा कोरे,दताञय कोरे, विशाल सलगर,अंरविंद खांडेकर,कुलाळ, कांबळे , सौ.शोभा बाबर, मोटेवाडी शाळेतील शिक्षक पडलवार बालाजी व शाळेतील विद्यार्थी व गावातील माता पालक उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे संचालन व आभार शाळेतील शिक्षक दिलीप वाघमारे यांनी केले .





