कागदपत्रांसाठी नागरिकांची गैरसोय
तिरोडा,दि.५ : तिरोडा तालुक्यातील मुंडीकोटा घोगरा परिसरातील तलाठी कार्यालयास टाळे असल्याने नागरिकांवर उंबरठे झिजविण्याची वेळ आली आहे. शेतकèयांसह विद्यार्थी व नागरिक यांची अत्यावश्यक कागदपत्रे अनेक चकरा मारून ही मिळत नसल्याने डोकेदुखी वाढली आहे. प्रशासनाने नागरिकांची अडचण लक्षात घेऊन तलाठी कार्यालयात कर्मचारी उपस्थित ठेवण्यासाठी कारवाई करण्याची मागणी केली
मुंडीकोटा व घोगरा मधील तलाठी कार्यालय अनेकदा बंदच असते. त्यामुळे विविध कामांसाठी आलेल्या नागरिकांची अडचण होत आहे. महत्त्वाचे दाखले आणि कागदपत्रे तातडीने हवी असल्याने नागरिक येथे येतात. परंतु, संबंधित तलाठी कार्यालयास असल्याने गरजूंची निराशा होते. कार्यालय कधी उघडणार, तलाठी केव्हा भेटणार, याविषयी कोणतीही माहिती उपलब्ध होत नाही. त्यामुळे नागरिकांना चकरा माराव्या लागतात. सध्या शाळा, महाविद्यालये सुरू होत असून शालेय कामासाठी व बँक तसेच प्रॉपर्टीच्या कामासाठी कागदपत्रांसाठी नागरिक व पालकांची पायपीट वाढली आहे.सातबारा, फेरफार, चतु:सीमांच्या नकला, दाखल्यातील चूक दुरुस्त करणे, पंचनामे तयार करण्यासाठी, जमीन-घर खरेदी केल्यानंतर खरेदीखताआधारे जुन्या मालकाचे नाव वगळून सातबाèयात नाव नोंदवणे, कर्जासाठी सातबाèयावर बोजा उतरवणे, एकूण जमिनीचा दाखला या आणि अशा अनेक दैनंदिन छोट्या-मोठ्या कामांसाठी लोकांना तलाठी कार्यालयांत जावे लागते. पण मुंडीकोटा व घोगरा परिसरात असलेली कार्यालये बंद राहत असल्याने हजारो शेतकरी व जनतेला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
मुंडीकोटा व घोगरा तलाठी कार्यालयात मंडळ अधिकारी दाते, तलाठी मलेवार,तलाठी भुते उपलब्ध होत नसल्याने नवीन फेरफार व सातबारा उतारा घेण्यासाठी सातारा परिसरातील नागरिकांची धावपळ होत आहे. शासन निर्णयाची पायमल्ली करणाèया या कर्मचाèयांची चौकशी करून त्यांचेवर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील जनतेने प्रशासनाकडे केली आहे.





