41.4 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home विदर्भ मच्छीमारांनी वाचवले नदीपात्रात पडलेल्या वृद्धाचे प्राण

मच्छीमारांनी वाचवले नदीपात्रात पडलेल्या वृद्धाचे प्राण

0
22

blank

तुमसर, दि. 5 -बुधवारला दुपारच्या सुमारास वैनगंगा नदीच्या पुलावरून जाणाऱ्या एका वृद्धाला भोवळ आल्यामुळे थेट नदीपात्रात पडले तर पावसामुळे नदीच्या पात्रात वाढ झाल्यामुळे ते वाचतील कि नाही याची शाश्वती नव्हती.जेव्हा ही घटना घडली त्यावेळी मच्छीमार बांधव तिथे होते. त्यांनी तात्काळ धाव घेत या वुद्धाचे प्राण वाचवले.
अडकोबा गाढवे असे या ८३ वर्षीय वृद्धाचे नाव असून ते लाखनी येथून उपचाराकरीता भंडारा जिल्हा रुग्णालयात उपचारकरीता आले होते. उपचार आटोपून ते वैनगंगा नदीच्या लहान पुलावरून पायी जात असताना अचानक ते नदीपात्रात पडले. पाण्याचा वेग पाहून त्यांना भोवळ आली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त  केला आहे.

blank