
ब्रह्मपुरी,दि.११:मागील फेब्रुवारी महिन्यापासून ब्रह्मपुरी तालुक्यातील चोरटी येथे दोन इसमांना गंभीर करुन तसेच हळदा, बोडधा, मुडधा, बल्लारपूर, कुडेसावली, पद्मापुर, भुज, आवळगांव, कोसंबी, मुरपार, गायडोंगरी व वायगांव परिसरात उच्छाद मांडून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणार्या नरभक्षक वाघाला पकडून त्याला पिंजर्यात बंद करण्यात वनविभागाला अखेर यश आल्याने परिसरातील नागरिकांची दहशतीतून सुटका झाली आहे.
ब्रह्मपुरी तालुक्यात मागील पाच महिन्यापासून एका नरभक्षक वाघाने उच्छाद मांडला असून त्यांच्या हल्ल्यात आतापर्यंत अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला तर काहींना गंभीर जखमांना समोरे जावे लागले. या वाघाला त्वरित पकडण्यात यावे यासाठी येथील नागरिकांनी वेळोवेळी वनविभागाला निवेदन दिले होते. तसेच क्रांती मोर्चा काढून वनविभागावर दबाव निर्माण केला. परंतु वाघाचा शोध घेण्यात वनविभागाला वारंवार अपयशच होते. इकडे नागरिकांचा व दुसरीकडे प्रशासनाचा त्यांच्यावर दबाव वाढतच होता. त्यामुळे वनविभागानेही या वाघाला पकडून पिंजर्यात बंद करण्यासाठी आपले सारे कसब पणाला लावले होते. त्यांच्या प्रयत्नाला अखेर आज सेामवार(१0 जुलै) रेाजी सायंकाळच्या सुमारास यश प्राप्त झाले. वाघाला पकडण्यात आल्याने येथील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला




