42.4 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home Top News पोलिस चकमकीत एक नक्षलवादी ठार?

पोलिस चकमकीत एक नक्षलवादी ठार?

0
26

गडचिरोली,दि.२३: जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील राजाराम खांदला उपपोलिस ठाण्यांतर्गत कवठाराम गावानजीकच्या जंगलात आज संध्याकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास झालेल्या चकमकीत पोलिसांनी एका नक्षल्याचा खात्मा केल्याचे वृत्त आहे.संध्याकाळी सी-६० पथकाचे जवान कवठाराम परिसरातील जंगलात कोम्बिंग ऑपरेशन राबवीत असताना नक्षल्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनी जोरदार प्रत्युत्तर देताच नक्षली घनदाट जंगलात पसार झाले. मात्र घटनास्थळावर एका नक्षल्याचा मृतदेह आढळल्याची प्राथमिक माहिती असून पोलिसांनी अधिकृत दुजोरा दिलेला नाही.

blank