राष्ट्रीय कुटूंब कल्याण कार्यक्रमात भंडारा सर्वोत्कृष्ट

0
8

भंडारा,दि.23 – राष्ट्रीय कुटूंब कल्याण कार्यक्रमांतर्गत भंडारा जिल्हा आरोग्य विभागाने सर्वाेत्कृष्ट कार्य केल्याबद्दल जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रवीशेखर धकाते व अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनिता बढे यांचा आरोग्यमंत्री दिपक सावंत यांच्या हस्ते मुंबई येथे नुकताच गौरव करण्यात आला. राष्ट्रीय कुटूंब कल्याण कार्यक्रमात भंडारा जिल्हयाने १५९ ट्नके उदिष्टये पूर्ण केल्यामुळे हा गौरव करण्यात आला आहे.
उपजिल्हा रूग्णालय तुमसरला कायाकल्प योजनेंतर्गत १ लाखाचा पुरस्कार देण्यात आला. डॉ. सचिन बाळबुद्धे रूग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक यांनी तो स्विकारला. मुंबई येथे झालेल्या या कार्यक्रमात खा.अरविंद सावंत,मुख्य सचिव डॉ. विजय सतबिरसिंग,विभागाचे आयु्क्त डॉ. प्रदिप व्यास,आरोग्य संचालक डॉ. सतीश पवार,अतिरिक्त संचालक अर्चना पाटील,उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल तसेच आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. सन २०१६-१७ मध्ये भंडारा जिल्हा रूग्णालयाने २ हजार ३२ स्त्री शस्त्रक्रिया, २ हजार ११ पुरूष शस्त्रक्रिया व पिपिआययुसीडी ४ हजार ४२५ अशी उल्लेखनिय कामगिरी केली आहे.याव्यतिरिक्त वर्षभरात केलेल्या अतिउत्कृष्ट कार्याबद्दल जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवीशेखर धकाते यांना अवार्ड घोषीत करण्यात आले. राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रमांतर्गत १६४.२७ टक्के कार्य करण्यात आले. राष्ट्रीय कुटूंब कल्याण पिपिआययूसिडी कार्यक्रमात १५८.८९ टक्के, राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रमात १ हजार २२२ शाळेमधील १ लाख ८८ हजार ६४८ विदयाथ्र्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. जिल्हा नियोजन समितीतून प्राप्त अनुदानाद्वारे १५ रूग्णांवर अतिशय अवघड व जटील तसेच महागडया १५ रूग्णांची टोटल हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया करण्यात आल्या.संपूर्ण महाराष्ट्रात फक्त भंडारा जिल्हा रूग्णालयात या शस्त्रक्रिया पार पडल्या. राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत जिल्हा सामान्य रूग्णालयाने केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रात अ १ ग्रेड मिळाले. यामध्ये १०० पैकी १०० मार्क घेवून भंडारा जिल्हा रूग्णालय सर्वोत्कृष्ट घोषीत करण्यात आला.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवीशेखर धकाते यांनी मिळालेल्या पुरस्काराबद्दल सर्व श्रेय समर्पित रूग्ण सेवा व टिम वर्कला दिले. उत्कृष्ट नियोजन व रूग्णालयातील सर्व डाॅक्टर,नर्स,अधिकारी, कर्मचारी, सफाईगार,अ‍ॅम्बुलंस चालक व आरोग्य सेवेत कार्यरत सर्व समर्पित सेवेबद्दल त्यांचे अभिनंदन करून तसेच जिल्हयातील पदाधिकारी यांच्याबद्दल आभार मानले.