37.3 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home महाराष्ट्र जांब येथे स्वांतत्र्यदिनी विद्यार्थिनीचा दुर्दैवी अंत

जांब येथे स्वांतत्र्यदिनी विद्यार्थिनीचा दुर्दैवी अंत

0
32

blank

नांदेड,15 (नरेश तुप्तेवार)- जांब(बु) येथून जवळील दापका राजा येथील तांड्यावरील एका विद्यार्थिनीचा शाळेत ध्वजारोहणासमयी भोवळ आल्याने दुर्दैवी अंत झाल्याची घटना आज घडली.
मृत विद्यार्थिनीचे नाव काजल बालाजी जाधव (वय-13) असे असून ती दापका राजा तांडा येथील संत नामदेव महाराज विद्यालयत सातव्या वर्गात शिकत होती.
आज स्वातंत्र्यदिनानिमित्ताने शाळेत ध्वजारोहणासाठी विद्यार्थिनी रांगा लावत असताना काजल ही भोवळ येऊन जमिनीवर खाली कोसळली. शिक्षकांनी तिला लगेच नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे डॉ. तिला मृत घोषित केले.
सदर घटनेची फिर्याद शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी शेषेराव डावकरे यांनी मुखेड पोलिस स्टेशनला केली. या फिर्यादीवरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र साहाने यांच्या दर्शनाखाली हवलदार गणपतराव गीत्ते हे करीत आहेत
स्वातंत्र्यदिनी घडलेल्या या प्रकारामुळे गावात शोककळा पसरली आहे.

blank