राज्य आणि केंद्र सरकारचे धोरण शेतकरी विरोधी-माजी आमदार जैन

0
9

गोंदिया,दि.16 : सत्तेत असलेल्या राज्य आणि केंद्र सरकारचे धोरण शेतकरी विरोधी आहे. त्यातच जिल्ह्यात पुन्हा दुष्काळाची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी अत्यंत अडचणीत आलेला आहे. राज्य आणि केंद्र शासनाने शेतकºयांना मदत करावी या मागणीसाठी राष्टÑवादी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी जागरूक राहून सरकार कडून शेतकºयांना न्याय मिळेल यासाठी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन माजी आमदार राजेंद्र जैन यांनी केले.
जिल्हा राष्टÑवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे होते. माजी आमदार दिलीप बन्सोड, विजय शिवणकर, नरेश माहेश्वरी, गंगाधर परशुरामकर, देवेंद्रनाथ चौबे, राजलक्ष्मी तुरकर, किशोर तरोणे, अशोक गुप्ता, केतन तुरकर, रमेश ताराम प्रामुख्याने उपस्थित होते.
रविवारी जिल्हा राष्टÑवादी काँग्रेस पक्षाची विस्तारीत कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत जिल्ह्यात निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती, शेतकºयांची कर्ज माफी, पंतप्रधान पिक विमा योजना, पक्ष संगठन या विषयावर चर्चा करण्यात आली होती. बैठकीत उपस्थित जिल्ह्यातील प्रत्येक तालुका राष्टÑवादी काँग्रेसच्या अध्यक्षांनी आपापल्या तालुक्यातील शेतकºयांची कर्जमाफी, पंतप्रधान पिक विमा योजना, तालुक्यात निर्माण झालेली दृष्काळी परिस्थिती आणि पक्ष संघटन यावर आपले विचार व्यक्त केले. सर्व तालुक्याचा आढावा घेतल्यानंतर दिलीप बन्सोड, विजय शिवणकर, नरेश माहेश्वरी, गंगाधर परशुरामकर, पंचम बिसेन, राजलक्ष्मी तुरकर, किशोर तरोणे यांनी कर्जमाफी, पिक विमा योजना, दुष्काळी परिस्थिती यावर मार्गदर्शन केले. होऊ घातलेल्या ग्रामपंचायतच्या निवडणुका, शासनाकडून कर्जमाफी आणि पीक विमा योजनेत शेतकºयांची दिशाभूल झाल्याने शासनाचा निषेध हे ठराव पारित करण्यात आले. सोबतच माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल यांनी जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करावा अशा त्यांना विनंती करणारा ठरावही पारीत करण्यात आला. यासभेमध्ये राष्टÑवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रत्येक तालुकास्तरावर दुष्काळ संबंधीचे निवेदन तहसीलदारांना देण्याचे ठरविण्यात आले.
याप्रसंगी बोलताना माजी आ. जैन यांनी, जिल्ह्यातील शेतकºयांना कर्ज माफी बाबत होत असलेली अडचण, पीक विमा काढताना शेतकºयांची झालेली परवड, दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकºयावर ओढवलेले संकट हे सर्व पाहता राष्टÑवादी काँग्रेस पक्षाच्या गावागावातील प्रत्येक कार्यकर्त्यांनी शेतकºयांच्या, शेतमजूरांच्या पाठीमागे उभे राहून त्यांना मदत मिळवून दिली पाहिजे असे आवाहन केले. दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी पक्ष पदाधिकाºयांनी प्रत्येक तालुक्यात दौरे करुन संपूर्ण माहिती गोळा करावी त्या नंतर सविस्तर अहवाल तयार करुन तो शासनाला सादर करुन शेतकºयांच्या मागण्या मान्य करण्यास शासनाला भाग पाडू असे ठरविण्यात आले.
बैठकीत अशोक सहारे, शिव शर्मा, डॉ. अविनाश काशिवार, हिरालाल चव्हाण, राजू एन. जैन, प्रेम रहांगडाले, कमल बहेकार, नामदेव डोंगरवार, छोटू पटले, कुंदन कटारे, उषा किंदरले, सुखराम फुंडे, जियालाल पंधरे, सुरेश हर्षे, ललीता चौरागडे, भाष्कर आत्राम, रमेश चुºहे, मनोज डोंगरे, दुर्गा तिराले, प्रिती रामटेके, सुनिता मडावी, विणा बिसेन, खुशबू टेंभरे, रजनी गौतम, कैलास पटले, राजेश भक्तवर्ती, छाया चव्हाण, रीता लांजेवार, रजनी गिºहेपुंजे, विनीत सहारे, राजेश दवे, नानू मुदलीयार, टिकाराम मेंढे, बंडू भेंडारकर, तुकाराम बोहरे, केदार चव्हण, किशोर पारधी, नरेश कुंभारे, दिलीप कापगते, खालीद पठान, गोपाल तिवारी, उद्धव मेहेंदळे, मनोज दहीकर, सी.के. बिसेन, जितेश टेंभरे, डुमेश चौरागडे, आशा पाटील, लता रहांगडाले, विनायक खैरे, तुंडीलाल कटरे, तिर्थराज हरिनखेडे, पुरनलाल उके, योगेश (मामा) बन्सोड, गणेश बरडे, शैलेष वासनिक व इतर पदाधिकारी उपस्थित होते.