37.9 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ शेतकºयांना नुकसानभरपाई देण्याची मागणी

शेतकºयांना नुकसानभरपाई देण्याची मागणी

0
32

blank

चंद्रपूर,दि.23 :जिल्ह्यात आलेल्या अवकाळी पावसामुळे तालुक्यातील वेडंली परिसरातील  शेतकर्यांंचे पिकाचे मोठे नुकसान झाले. त्यांची भरपाई देण्याच्या  मागणी निवेदन सचिन राजुरकर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.त्या निवेदनाची प्रत केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनाही देण्यात आले आहे.१७ सप्टेंबरला रात्री आलेल्या अवकाळी वादळी पावसाने परिसरातील शेतकºयांचे मोठे नुकसान झाले. त्यात वेंडली सह अनेक गावातील उभ्या पिकांना मोठा फटका बसला.तुर, कपाशीचे पीक पूर्णत: कोलमडले. बºयाच ठिकाणी पाणी साचल्याने पिके बुडाली. ऐन भरात असलेल्या पिकांचे नुकसान झाले. आधीच शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. त्यातच वादळी पावसाने आर्थिक संकटात सापडला आहे. परिसरातील गावातील मोका तपासणी करुन शेतकºयांना न्याय मिळवून देण्याची मागणी निवेदनातून विश्वनाथ पाचभाई,रविंद्र टोंगे,श्रीरंग वरारकर,मधुकर टोंगे,परमेश्वर चालुरकर,दिनेश धांडे,आकाश लोडे,माेरेश्वर चालुरकर आदीनी केली आहे.

blank