34.8 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home राजकीय भाजप-शिवसेनेतील राजकारणामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाकडे दुर्लक्ष : विखे-पाटील

भाजप-शिवसेनेतील राजकारणामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाकडे दुर्लक्ष : विखे-पाटील

0
20

अहमदनगर,दि.17- सरकारमधील दोन प्रमुख पक्षांमध्ये सुरू असलेल्या शह-काटशहाच्या राजकारणामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाकडे दुर्लक्ष झाल्याची भावना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली आहे.
दिवाळीसाठी नागरिक मोठ्या शहरांमधुन बाहेरगावी जात असतात त्यामुळे एसटीला मोठी गर्दी असते त्याचवेळी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. खासगी वाहनचालकांकडून प्रवाशांची मोठी लूट होत असून प्रवाशांना असुरक्षित प्रवास करावा लागत आहे. याबाबत विखे-पाटील यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

blank