मुख्यमंत्र्यांसह ना.बडोलेंच्या दत्तक गावात भाजप भुईसपाट

0
13

नागपूर/गोंदिया,दि.17 : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना होमग्राऊण्डवरच धक्का बसला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत फडणवीसांनी दत्तक घेतलेल्या फेडरी गावातच काँग्रेस-राष्ट्रवादी पुरस्कृत महिला सरपंचपदी विराजमान झाल्या.नागपुरातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमध्ये मुख्यमंत्र्यांना झटका मिळाला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या फेटरी गावात ग्रामपंचायत निवडणूक झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत केलेल्या धनश्री ढोमणे सरपंच झाल्या आहेत.तर गोंदियाचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दत्तक घेतलेल्या सडक अर्जुनी तालुक्यातील कनेरी व सडक अर्जुनी पंचायत समितीच्या सभापती कविता रंगारी यांचे गृहग्राम कोहमारा येथे भाजप भुईसपाट झाली आहे.

फेडरी येथे एकूण नऊ जागांपैकी पाच जागा भाजपने जिंकल्या आहेत, तर चार जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसला विजेतेपद मिळाले. मात्र सरपंचपद भाजपच्या हातून निसटले.काल 18 जिल्ह्यातील जवळपास 4 हजार 119 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासह सदस्यपदासाठी मतदान झाले. यातील साधारण 380 ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत.

गोंदिया : जिल्ह्यातील ३४१ ग्रामपंचायतीसाठी सोमवारी (दि.१६) निवडणूक घेण्यात आली. यासाठी १ हजार ८७ मतदान केंद्रावरुन जवळपास तीन लाख ८२ हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. जिल्ह्यात एकूण ८५.५८ टक्के मतदान झाले. तिरोडा तालुक्यातील वडेगाव येथील खुनाची घटना वगळता इतर सर्वच केंद्रावर मतदान शांततेत पार पडले.मात्र आज जेव्हा निकाल निघू लागले तेव्हा मतदारानी भाजपला स्पष्टपणे नाकारले नसले तरी पुर्ण कल सुध्दा दिला नसल्याचे समोर आले आहे.भाजपच्या नेत्यांना आपल्या मतदारसंघात चांगलीच ताखद लावावी लागली असून पालकमंत्रीसह सडक अर्जुनीच्या सभापतींना आपले गाव वाचविता आले नाही.त्यातच माजी आमदार खोमेश रहागंडाले यांनी आपल्या तुमखेडा गावात भाजपला स्पष्ट बहुमत मिळवून दिले.जिल्ह्यात सरासरी विचार केल्यास सडकअर्जुनी तालुक्यात राष्ट्रवादी व काँग्रेसने सरसी घेतली आहे.गोरेगाव तालुक्यातील सर्वाधिक चर्चीत ग्रामपंचायत कंटगी येथे काँग्रेसपुरस्कृत भाजपचे उमेदवार तेजेंद्र हरिणखेडे यांनी राष्ट्रवादी पुरस्कृत भाजप उमेदवार रहागंडाले यांना 12 मतांनी पराभव केला.हिुरडामाली येथे भाजप जिल्हाध्यक्ष व माजी खासदारांनी भाजपला सरपंच पद मिळवून दिले आहे.तर जिल्हयातील पहिल्या आदर्श ग्राम कोहळीटोलाच्या सरपंचपदी जिवन लंजे हे आपल्या पॅनलसह निवडून आले आहेत.जिल्ह्यात शिवसेनेचे 14 सरपंच जिल्हाध्यक्ष मुकेश शिवहरे यांच्या नेतृत्वात विजयी झाले आहेत.तिरोडा तालुक्यातील सेजगाव येथे भाजपचे माजी पंचायत समिती सभापती बंडू सोनवाने यांना सरपंचपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराकडून पराभव स्विकाराव लागला आहे.गोरेगाव तालुक्यातील डव्वा येथे काँग्रेसच्या माया कटरे,सटवा येथे भाजपचे विनोद पारधी,तुमखेडा(खुर्द) त्रिवेँणी रहांगडाले,बघोली,राजेश कटरे,कुर्हाडी अल्का पारधी,तिमेझरी माया चव्हाण काँग्रेस,कटंगी येथे काँग्रेस-भाजप युतीचे तेजेंद्र हरिणखेडे,सिलेगाव भाजपच्या उषा रहागंडाले,गणखैरा येथे भाजच्या धारा तुपट,हिरडामाली येथे भाजपच्या रंजना बरियेकर,पुरगाव येथे अनंता ठाकरे,दवडीपार येथे दमयंता कटरे ,झांजिया येथे उषा रहागंडाले व बोटे येथे काँग्रेसचे उत्तम कटरे विजयी झाले आहेत.आमगाव तालुक्यातील तिगांव येथे सरंपच पदी नरेंद्र शिवणकर,भजियापार येथे जियालाल पटले,बुराडीटोला येथे राजेंद्र मटाले आदि विजयी झाले आहेत.