37.1 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home Featured News आर्वीत बळीराजा अभिवादन सोहळा संपन्न

आर्वीत बळीराजा अभिवादन सोहळा संपन्न

0
43

blank

आर्वी,दि.21- स्थानिक मराठा सेवा संघ कार्यालय स्वामी इन्क्लेव्ह आर्वी येथे बळीराजा पूजनाचा सोहळा आनंदमय वातावरणात पार पडला.अप्परवर्धा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अनिलराव गोहाड यांच्या अध्यक्षतेत व अॅड. सुरेंद्रजी जाणे तथा शेतकरी कामगार संघटनेचे अध्यक्ष  रूपचंदजी टोपले या प्रमुख अतिथींच्या उपस्थितीत आर्वीचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष  प्रशांतजी सव्वालाखे यांच्या हस्ते बळीराजाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
सदर कार्यक्रमात बळीपूजनानंतर जयघोष करून बळीउत्सवाचे ऐतिहासिक महत्त्व प्रमुख अतिथी सुरेंद्रजी जाणे यांनी पटवून दिले. नगराध्यक्ष प्रशांत सव्वालाखे यांनी आपले मनोगत व्यक्त करून सर्व उपस्थितांना बळी उत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या. शेवटी अनिलदादा गोहाड यांचे अध्यक्षीय भाषण झाले. मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष वीरेंद्र कडू , उपाध्यक्ष प्रा. विजय चौधरी, सदस्य विजयराव मारोडकर, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा सदस्या सौ. सुनिताताई जाणे, सौ.संगिताताई कडू, सौ. निताताई पोटे, डाॅ. चंद्रशेखर ढगे, डाॅ. अभिलाष धरमठोक, संदीपराव पोटे, तुकारामजी पोटे, पंकजराव खोपे, सुधाकरराव देशमुख, मनोज राऊत, राहुल गुजर, शुभम् कडू, कु.वैष्णवी, व स्वामी कडू सदर कार्यक्रमाला उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन मराठा सेवा संघ आर्वी च्या वतीने करण्यात आलेले होते.

blank