राष्ट्रीय महामार्गावर द बर्निग ट्रक

0
17

देवरी,दि.21- गोंदिया जिल्ह्यातून जाणार्या मुंबई-कलकत्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6  वर देवरी नजीकच्या पुतळी फाट्यावर सकाळी 5 वाजेच्या सुमारास चालत्या ट्रकला आग लागल्याची घटना घडली.नागपूरहून रायपूरला हा ट्रक(सीजी 04-एस 5037) कागदाचे रोल घेऊन चालला होता.दरम्यान चालकालाच्या लक्षात येताच त्यांने रस्त्याच्या कडेला ट्रक उभे करुन आग विझविण्यासाठी प्रयत्न केले.परंतु काहीही न मिळाल्याने ट्रकमधील सर्व कागदाचे रोल जळाले सोबतच ट्रकचेही नुकसान झाले.याप्रकरणी देवरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरु केला आहे.