28.7 C
Gondiā
Saturday, August 1, 2026
Home Featured News क्रेझी कॅसल वाचविण्यासाठी धावपळ

क्रेझी कॅसल वाचविण्यासाठी धावपळ

0
75

नागपूर,दि.18ः-  अंबाझरी परिसरातील क्रेझी कॅसल बंद होणार, हे जवळपास निश्चित झाले असताना आता पुन्हा ते वाचविण्यासाठी वरिष्ठ पातळीवर धावपळ सुरू झाली आहे. मेट्रो रेल्वेही धावेल आणि क्रेझी कॅसलही टिकून राहील, यासाठी महामेट्रोनेच आता नवे डिझाइन तयार करून दिले आहे. पुढच्या आठवड्यात यावर पुन्हा बैठक बोलावण्यात आली असून त्यात याबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
अंबाझरी तलावाजवळ असलेल्या क्रेझी कॅसलची जागाही मेट्रो रेल्वेसाठी मागण्यात आली आहे. रनिंग सेक्शन, पार्किंग आणि स्टेशनसाठी क्रेझी कॅसलची ६ हजार ३५९.५९६ चौरस मीटर जागा महामेट्रोला हवी आहे. हल्दीरामला ही जागा नासुप्रने लीजवर दिली असून याची मुदत २०२१ पर्यंत संपत आहे. लीजवर दिलेली जमीन शासन महत्त्वाच्या प्रकल्पासाठी केव्हाही परत घेऊ शकते. मात्र, क्रेझी कॅसल शहराची एक ओळख बनले आहे.