25.2 C
Gondiā
Thursday, July 30, 2026
Home Featured News पिडीत शेतकरी कुंटुंबास मदतीचा हात

पिडीत शेतकरी कुंटुंबास मदतीचा हात

0
32
पवार प्रगतीशिल मंचतर्पेâ धनादेश वाटप
गोंदिया,दि.0१ : तालुक्यातील फत्तेपूर येथील शेतकरी मधु पूरनलाल रहांगडाले (३५) याने कर्जबाजारीपणाने त्रस्त होऊन १७ नोव्हेंबर रोजी आत्महत्या केली होती. अल्पभूधारक शेतकरी असल्याने त्यांच्या कुटुंबियावर आभाळ कोसळले. त्यांच्या पश्चात त्यांच्या मागे आई, पत्नी व दोन मुली असा आप्त परिवार आहे. दरम्यान त्यांच्या कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती पाहून पोवार प्रगतीशिल मंचच्या वतीने पिडीत कुटुंबाला समाजातील विविध दानदात्यांकडून मिळालेल्या देणगीतून आर्थिक मदत देण्यात आली. यावेळी डॉ.कैलाशचंद्र हारींनखेडे, डॉ.संजीव रहांगडाले, राजेश राणे, सुरेस पटले, योगेश ठाकरे, केतन तुरकर, बीटू बिसेन, पंकज पटले, योगी येडे, मुनेस अंबुले, देवेश बिसेंन, जैस चौहाण, गुलाब ठाकुर, छत्रपाल चौधरी, संदीप बघेल, संतोष बिसेन, विकी बघेले, प्रेम टेंभरे, गुड्डू कटरे, अनिल रहांगडाले, गौरव तुरकर, कुलदीप बघेले, प्रतीक रहांगडाले, रोहित भगत, राहुल बिसेन, अमित तुरकर, राजेश पटले, बाबा बिसेन, कार्तिक चौहाण, संदीप रहांगडाले समाजबांधव उपस्थित होते.