24.3 C
Gondiā
Sunday, August 16, 2026
Home विदर्भ रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ते अशी स्थिती हे दुर्दैवच : आ. रवि...

रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ते अशी स्थिती हे दुर्दैवच : आ. रवि राणा

0
30

अमरावती,दि.15ः- ग्रामीण भागामध्ये प्रत्येक गांव हे रस्त्याला जोडले असावे व तो रस्ता चांगला डांबरीकरणाचा असावा जेणे करुन ग्रामीण भागातील लोकांना येण्याजाण्याची चांगली सोय व्हावी या करीता आमदार रवि राणा हे सतत प्रयत्नशिल असतात परंतू सद्या ग्रामिण भागातील अनेक रस्त्यांवर खड्डे असल्याची तक्रार ग्रामिण भागातील नागरीकांनी आमदारांकडे केली असता राणा यांनी तातडीने बडनेरा मतदार संघातील भातकुली रोड, अंजनगांव बारी रोड या रस्त्यांसह इतर ग्रामिण भागातील रस्त्यांची पाहणी केली तसे पाहणी करत असतांनाच स्वत: उभे राहुन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांसह रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या अभियानाला सुरुवात केली. ग्रामीण भागातील सर्व रस्त्यांवरील खड्डे हे आठ दिवसांमध्ये बुजविण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य कार्यकारी अभियंत्याला दिले. त्यामुळे आता ग्रामिण भागातील नागरीकांची रस्त्यावरील खड्डे बुजविल्या गेल्यामुळे गैर सोय थांबली असून सर्व नागरीक समाधान व्यक्त करीत आहे. तसेच जिल्ह्याच्या पालकमंत्र्याकडे सावíजनिक बांधकाम खाते असल्या नंतरही गा्रमिण भागातील रस्त्यांची रस्त्यावर खड्डे कि खड्यात रस्ते अशी स्थिती होणे हे ग्रामीण भागातील जनतेचे दुदैवच आहे असे सांगितले. यावेळी राजू रोडगे, भातकुली नगर पंचायत उपाध्यक्ष गिरीष कासट, आशिष कावरे, हर्षल रेवने, दिलीप पाटील, हर्षद वाचासुंदर, राजू हरणे, श्रीकृष्ण पाठील, सतिश मंत्री, अमर तरडेजा आदींसह असंख्य नागरीक उपस्थित