
नागपूर,दि.15ः राज्य सरकारच्यावतीने आज शिक्षय अभियोक्ता परिक्षा नागपूर येथील रायसोनी महाविद्यालयाच्या परिक्षा केंद्रावर सकाळी 9 वाजता ठेवण्यात आली होती.त्यासाठी विदर्भातील अनेक जिल्ह्यातून भविष्यात शिक्षकाची नोकरी या परिक्षेनंतर मिळेल ही आश घेऊन परिक्षेसाठी पोचले असता त्या भविष्यातील शिक्षक शिक्षिकांना रायसोनीच्या महाविद्यालय प्रशासनाने परिक्षा ओळखपत्रावरील नाव आधार कार्डावरील नावात फरक असल्याचे कारण पुढे करुन त्यांना प्रवेश न दिल्याने या परिक्षार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहण्याची वेळ आल्याची माहिती परिक्षार्थ्यांनी दिली असून प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे.सकाळी 9 वाजता पेपर असल्याने कुणी 5 वाजता रेल्वेने निघाले तर कुणी बस ने परंतु परिक्षा केंद्रावरील या गोंधळाने त्यांचे भविष्य मात्र अर्ध्यावरच लटकले गदेले. शिक्षक अभियोक्ता परिक्षा आयोजित करण्यात आली होती सकाळी 9 वाजता पेपर असल्याे परिक्षार्थी वेळेवर हजर झाले परंतु 20 ते 25 परिक्षार्थ्यांना महिलां विशेष करुन ज्यांचे आधारकार्ड लग्नानंतरचे आहे. परंतु परिक्षा ही शैक्षणिक कागदपत्रावरील नावाच्या आधारे असल्याने त्यांना रायसोनी प्रशासनाने प्रवेश नाकारल्याने परिक्षेपासून वंचित राहावे लागल्याचा प्रकार आज शुक्रवारला सकाळी घडला असून महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर गोंधळ सुरु आहे.





