अध्यक्षांच्या बंगल्यावर आज अधिकारी,जि.प.सदस्यांचे वास्तु जेवण

0
11

गोंदिया,दि.15ः- गोंदिया जिल्हा निर्मितीला 18 वर्षाचा कार्यकाळ लोटला,सुरवातीच्या पहिल्या पाच सहा वर्षाचा कार्यकाळात प्रशासकीय इमारतीसह पदाधिकारी व अधिकारी यांच्या निवासस्थानाची बांधकाम करण्यात गेली.त्यानंतर हे बंगले व निवासस्थान तयार झाले तरीही कुणीही जायला पुढाकार घेत नव्हते.अशातच तत्कालीन सीईओ गेडाम यांनी सीईओ बंगल्यात जाण्याचा पायंडा पाडला आणि त्यांच्यानंतर येणारे प्रत्येक सीईओ त्या बंगल्यात जाऊ लागले.पण पदाधिकारी मात्र भाड्याचे घर घेऊन आपल्याच गावावरुन अपडाऊन करत असल्याचे चित्र सुरुच राहिले.यावर बेरार टाईम्सने सातत्याने पदाधिकारी यांचे निवासस्थान असताना घरभाडे व वाहनाच्या इंधनावर प्रशासनाचा पैसा अधिक खर्च होत असल्याचे लक्ष वेधण्याचे काम निष्पक्षपणे केले.या मुद्यावर सतत लक्ष ठेवल्याने अखेर जिल्हा प्रशानाने जि.प.अध्यक्षांसह पदाधिकारी व अधिकारी यांना निवासस्थानाचे वाटप केले.त्यानुसार पदाधिकारी यांचे 1 डिसेंबरपासून घरभाडे भत्ते बंद करुन शासकीय निवासस्थानात जाण्याचे पत्र दिले.घरभाडे भत्ते बंद झाल्यानंतर मात्र जिल्हा परिषद अध्यक्षा उषाताई मेंढे यांनी अखेर अध्यक्षांचे शासकीय निवासस्थान असलेल्या बंगल्यात जाण्याचा निर्णय घेतला आणि.गेल्या दहा दिवसापुर्वीच त्यांनी संक्षिप्तमध्ये गृहप्रवेश करुन राहण्यास सुरवात केली.बंगल्यात राहण्यास सुरवात झाल्यापासून अध्यक्ष मॅडमनी बैठकाही आपल्या बंगल्यावर सुरु केल्या आहेत.त्यातच आज 15 डिसेंबरला विद्यमान जिल्हा परिषद पदाधिकारी यांच्या कार्यकाळातील अखेरची सर्वसाधारण सभा असल्याने या सभेला हजर राहणारे  सर्व जिल्हा परिषद सदस्य व अधिकारी यांच्यासाठी अध्यक्षांच्या बंगल्या्च्या वास्तुपूजनाच्या निमित्ताने गोडधोड जेवणाचे आयोजन करण्यात आले आहे.अध्यक्षांनी शासकीय निवासस्थान स्विकारले असून इतर पदाधिकारी त्यांचे अनुकरण करतात की नव्या पदाधिकारीसाठी निवासस्थान सोडून जातात याकडे लक्ष लागले आहे.