24.7 C
Gondiā
Tuesday, August 18, 2026
Home विदर्भ सभापती पदाची आरक्षण सोडत,गोंदिया ,तिरोडा,आमगाव,देवरीत महिला

सभापती पदाची आरक्षण सोडत,गोंदिया ,तिरोडा,आमगाव,देवरीत महिला

0
27

गोंदिया,दि.१६ : जिल्हयातील 8 पंचायत समित्यांच्या साभापती पदाकरीता त्यांना सद्य:स्थितीत लागू असलेल्या आरक्षणाच्या समाप्तीनंतर लगेच येणाऱ्या दिवसांपासून अडिच वर्षाच्या कालावधीकरीता आरक्षित पदांची सोडत आज शनिवारी १६ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात काढण्यात आली.जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे,जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेंढे,उपजिल्हाधिकारी शुभांगी आंधळे यांच्यासह इतर अधिकार्यांच्या उपस्थितीत काढण्यात आलेल्या सोडतीमध्ये देवरी पंचायत समितीचे सभापतीपद हे ओबीसी नामाप्र महिलांसाठी राखीव करण्यात आले आहे.तर आमगाव एससी महिला,सालेकसा एसटी जनरल,गोरेगाव सर्वसाधारण,सडक अर्जुनी ओबीसी,अर्जुनी मोर सर्वसाधारण,गोंदिया व तिरोडा पंचायत समितीचे सभापती पद हे सर्वसाधारण गटातील महिलांसाठी राखीव निघाले आहे.