25.1 C
Gondiā
Tuesday, August 25, 2026
Home Top News राजस्थानात बस नदीत कोसळून 26 प्रवाशांचा दुर्देवी मृत्यू

राजस्थानात बस नदीत कोसळून 26 प्रवाशांचा दुर्देवी मृत्यू

0
21

जयपूर(वृत्तसंस्था)दि.23 – सवाई माधोपूर येथे शनिवारी सकाळी भीषण अपघात झाला. बनास नदीवरील पुलावरून प्रवाशांनी भरलेली मीनी बस नदीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 26 प्रवाशांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. माहिती मिळताच पोलीस आणि अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी बचावकार्याला सुरुवात केली आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर लोक जमा होण्यास सुरुवात झाली.