22.9 C
Gondiā
Friday, August 28, 2026
Home महाराष्ट्र आतातरी राज्यातील दुष्काळी भागांची यादी जाहीर करा – एकनाथ खडसे

आतातरी राज्यातील दुष्काळी भागांची यादी जाहीर करा – एकनाथ खडसे

0
27

नागपूर दि.23:- राज्यातील अवर्षणग्रस्त भागात दुष्काळ जाहीर करण्यास होत असलेल्या विलंबावरून भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी विधानसभेत स्वपक्षाला घरचा आहेर दिला. सरकार आतातरी राज्यातील दुष्काळी भागांची यादी जाहीर करणार आहे का? डिसेंबर उलटून जानेवारी महिना आला तरी सरकारने दुष्काळी गावांबद्दल कोणतीही घोषणा केलेली नाही. सर्वेक्षण होऊन चार-सहा महिने उलटतात तरी दुष्काळ जाहीर केला जात नाही. या काळात लोकांनी मरायचे का? सरकार त्या दृष्टीने कोणतीही व्यवस्थादेखील करत नाही, असे म्हणून माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी सरकारला सुनावले.