22.9 C
Gondiā
Friday, August 28, 2026
Home Top News पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन; मेजरसहित 3 जवान शहीद

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन; मेजरसहित 3 जवान शहीद

0
27

श्रीनगर(वृत्तसंस्था),दि.23- पाकिस्तानने शनिवारी पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. नियंत्रण रेषेजवळील केरी सेक्टरमध्ये गस्त घालत असलेल्या भारतीय लष्कराच्या जवानांवर निशाणा साधत पाकिस्तानी सैन्याने गोळीबार सुरू केला. यात लष्कराचे 3 जवान शहीद झाले. यात एका मेजरचाही समावेश आहे. या गोळीबारात एक जवान जखमी झाला असून त्याच्यावर उधमपूर येथील लष्कराच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार सुरू झाल्यानंतर भारतीय जवानांकडूनही चोख उत्तर दिले गेले. या घटनेनंतर सुरू झालेली लष्करी कारवाई अद्याप सुरूच आहे.