24.5 C
Gondiā
Saturday, August 29, 2026
Home विदर्भ अटलबिहारी बाजपेयी जन्मदिनी तिनचाकी सायकल वाटप

अटलबिहारी बाजपेयी जन्मदिनी तिनचाकी सायकल वाटप

0
32

अर्जुनी मोरगांव,दि.25ः-.भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी बाजपेयी यांचा जन्मदिन अर्जुनी मोरगांव येथील पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या जनसंपर्क कार्यालयात साजरा करण्यात आला.जन्मदिवसाचे औचित्य साधुन बुधेवाडा येथील अपंग महिला सविता ताराचंद भानारकर महिलेला सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून तिनचाकी सायकल देण्यात आली. सर्वप्रथम माजी पंतप्रधान अटलबिहारी बाजपेयी यांच्या प्रतिमेसमोर केक कापुन जन्मदिन साजरा करण्यात आला. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष उमाकांत ढेंगे, कृऊबा समिती उपसभापती लायकराम भेंडारकर, बालु बडवाईक, नुतनलाल सोनवाने, नितीन नाकाडे, विनोद नाकाडे, माणिक मसराम, मधुकर मेश्राम व अन्य मान्यवर उपस्थित होते.