24.5 C
Gondiā
Saturday, August 29, 2026
Home विदर्भ राष्ट्रवादीच्यावतीने शेतकरी सन्मान दिंडीचे आयोजन

राष्ट्रवादीच्यावतीने शेतकरी सन्मान दिंडीचे आयोजन

0
40

गोंदिया,दि.25ःः राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सड़क अर्जुनी तालुकाच्या वतीने तालुक्यातील खाडीपार येथून शेतकरी सन्मान दिंडी व जनजागृती अभियानाची सुरवात झेंडी दाखवून आज 25 डिसेंबरला करण्यात आली. यावेळी माजी आमदार राजेंद्र जैन,दिलीप बंसोड, नरेश माहेश्वरी,माजी जि.प.अध्यक्ष विजय शिवनकरमनोहर चंद्रिकापुरे प्रदेश प्रतिनिधी तथा किसान सभा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,रमेश चुरे जि.प.सदस्य,अविनाश काशीवार तालुका अध्यक्ष, आनंद अग्रवाल ,गजानन परशुरामकर,नरेश भेंडारकर,सुरेश हर्षे,सुखराम फुंडे,लक्ष्मण लंजे, एफ.आर.टी शाहा महासचिव किसान सभा आदी पदाधिकारी उपस्थित होते. ही दिंडी सडक अर्जुनी तालुक्यातील प्रत्येक जिल्हापरिषद क्षेत्रामध्ये 30 डिसेंबरपर्यंत फिरणार आहे.यावेळी शेतकर्यांना पिक विमा,दुष्काळ,धानाचे भाव,कर्जमुक्ती,महागाईमुळे कसे नुकसान होत आहे यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती राजेंद्र जैन यांनी शुभारंभप्रसंगी दिली.समारोपप्रसंगी सडक अर्जनी येथे हल्लाबोल आंदोलन करुन करण्यात येणार आहे.