37.9 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ पल्ले-कुरूमपल्ली जंगलात पोलिस-नक्षल चकमक

पल्ले-कुरूमपल्ली जंगलात पोलिस-नक्षल चकमक

0
17

गडचिरोली ,दि.२८ः अहेरी तालुक्यातील पेरमिली उपपोलिस ठाण्याच्या हद्दीतील पल्ले-कुरूमपल्ली जंगल परिसरात सी-६0 जवान नक्षविरोधी अभियान राबवित असताना  (दि.२७) दुपारच्या सुमारास पोलिस-नक्षल चकमक उडाली. प्राप्त माहितीनुसार आज पल्ले-कुरूमपल्ली जंगल परिसरात पोलिस अधीक्षक डॉ. देशमुख यांच्या मार्गदर्शनात सी-६0 जवान नक्षलविरोधी अभियान राबवित होते. दरम्यान जंगलात दबा धरून बसलेल्या नक्षल्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल नक्षल्यांच्या दिशेने गोळीबार केला असता पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षली जंगलात पसार झाले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता घटनास्थळी नक्षली साहित्य जप्त करण्यात आल्याची माहिती आहे.

blank