43.7 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home Top News वरोर्‍यात वीज उपकेंद्रात भीषण आग

वरोर्‍यात वीज उपकेंद्रात भीषण आग

0
30

चंद्रपूर,दि.02- वरोरा शहरात 220 केव्ही वीज उपकेंद्रात भीषण आग लागून ट्रान्सफॉर्मरमध्ये दोन स्फोट झाल्याने संपूर्ण परिसर हादरला आहे. आग आटोक्यात आली असून 35 गावांचा वीजपुरवठा ठप्प झाला आहे. दरम्यान, ही आग नेमकी कशामुळे लागली, याबाबत अद्याप माहिती समजू शकलेली नाही.महापारेषणचे वरिष्‍ट अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. खंडीत झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी अजूनही 24 तास लागण्याची शक्यता आहे.घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी अथक परिश्रम घेऊन मध्यरात्री लागलेली आग पहाटेच्या सुमारास आटोक्यात आणली. अन्यथा मोठा अनर्थ टळला.ट्रान्सफार्मर जळून खाक झाल्याने वरोरा तालुक्यातील जवळपास 35 गावांचा वीजपुरवठा खंडीत झाला आहे. या भीषण आगीत महापारेषणचे लाखोंचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे.

blank