34.6 C
Gondiā
Wednesday, June 17, 2026
Home Top News अक्कलकोट: 40 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा

अक्कलकोट: 40 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा

0
37

अक्कलकोट (सोलापूर)- येथील शासकीय वसतिगृहातील 40 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना आज (शुक्रवार) सकाळी घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांना आज सकाळी नाश्‍त्यासाठी पोहे देण्यात आले होते. पोहे खाल्ल्यावर विद्यार्थ्यांना त्रास सुरू झाला. विद्यार्थ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सतरा विद्यार्थ्यांना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. विषबाधा होण्याचे कारण समजू शकलेले नाही. पुढील तपास सुरू आहे.