34.4 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home विदर्भ आश्रमशाळेतील १६ वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या

आश्रमशाळेतील १६ वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या

0
19

यवतमाळ दि.९ :जिल्ह्याच्या घाटंजी तालुक्यात येणाऱ्या रामपूर येथे असलेल्या आश्रमशाळेतील एका १६ वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची खळबळ जनक घटना समोर आली आहे. या विद्यार्थिनीच्या आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नसून पोलीस पुढील तपास करीत आहेत.घाटंजी मधील रामपुर आश्रम शाळेतील कु. राजश्री चौरंग कोटनाके वय १६ वर्ष या विद्यार्थिनीने गळफास घेवुन आपले जीवन संपविले. सदर घटना आज सकाळी ८ च्या सुमारास घडली असल्याचे सांगण्यात येत आहे. आत्महत्येपूर्वी विद्यार्थिनीने एक चिठ्ठी लिहून ठेवली असल्याने ही आत्महत्या असल्याचे समजते आहे. या प्रकरणी घाटंजी पो.स्टेशन ला गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस यासंदर्भात चौकशी करत आहेत.

blank