प्रलंबित विनावाद बदल अर्ज १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी दरम्यान विशेष अभियान

0
8

गोंदिया,दि.९ : जिल्ह्यातील सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाअंतर्गत नोंदणीकृत न्यासाच्या विश्वस्तांनी सहायक धर्मादाय आयुक्त कार्यालयात प्रलंबित असलेले विनावाद बदल अर्ज विशेष अभियान १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी २०१८ या कालावधीत राबविण्याचे ठरविले आहे. तरी नोंदणीकृत न्यासाच्या विश्वस्तांनी सहायक धर्मादाय आयुक्त यांचे कार्यालयात विना वादाचे बदल अर्ज प्रलंबित असल्यास व न्यायप्रविष्ट असल्यास सदरील कालावधीत विश्वस्तांनी कार्यालयात उपस्थित राहून विना वादाची प्रकरणे आवश्यक त्रुटींची व कागदपत्रांची पुर्तता करावी. जेणेकरुन प्रलंबित असलेले बदल अर्ज विशेष अभियानाअंतर्गत तात्काळ निकाली काढता येतील. असे सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाच्या सहायक धर्मादाय आयुक्त ममता रेहपाडे यांनी कळविले आहे.