अहमदाबाद,दि.16(वृत्तसंस्था) –विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रवीण तोगडिया सोमवारी पहाटेपासूनअचानक बेपत्ता झाले होते. तब्बल १२ तासांनी ते एका बागेमध्ये बेशुद्धावस्थेत अाढळले. त्यांच्यावर अहमदाबादेतील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान त्यांनी एक पत्रकार परिषद घेऊन आपल्या एन्काऊंटरचे षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप केला. पत्रकार परिषदेतच त्यांना रडू कोसळले.प्रवीण तोगडिया यांना सोमवारी रात्री अहमदाबाद येथे बेशुद्धावस्थेत आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली. त्यांच्यावर सध्या येथील चंद्रमणी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले होते. अखेर आज (मंगळवार) सकाळी त्यांनी पत्रकार परिषद घेत आपल्याबाबत घडलेल्या घडामोडींची माहिती दिली. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.
पत्रकार परिषदेत काय म्हणाले, विहिंपचे प्रवीण तोगडिया
> काही काळापासून माझा आवाज दाबण्याचा जोरदार प्रयत्न केला जात आहे.
> मी हिंदू ऐक्यासाठी लढत आहे.
> देशभरात माझ्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जुने खटले काढून मला त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
> मला अटक करून एका तुरुंगातून दुसऱ्या तुरुंगात पाठवण्याचे काम गुजरातमधून सुरू झाले.
> मकरसंक्रांतीच्या दिवशी राजस्थान पोलिसांचे पथक अजामीनपात्र वॉरंट घेऊन मला अटक करण्यासाठी आले.
> हा माझा आवाज दाबण्याचा प्रय्तन आहे. त्या परिस्थितीतही मी हिंदु संघटनेचे काम करत राहिली.
> मी मुंबईत एका कार्यक्रमातून एका कार्यक्रमातून रात्री 1 ते 1.30 दरम्यान पोहोचलो. पोलिसांनी मी रात्री 2.30 वाजता यायला सांगितले. सकाळी मी पुजा करत असताना एक व्यक्ती माझ्या घरात आला. त्याने सांगितले लगेचच इथून निघा तुमच्या एन्काऊंटरसाठी लोक निघाले आहेत.
> मी मृत्यूला घाबरत नाही. त्यामुळे मी त्याचे ऐकले नाही. बाहेर दोन पोलिस होते. तेवढ्यात मला एक फोन आला. त्यावर राजस्थान पोलिसांचा ताफा गुजरात पोलिसांच्या मदतीने येत असल्याचे मला कळले.
> मला वाटले काही झाले तर माझे जे व्हायचे ते होईल, पण देशभरातील वातावर चिघळेल. लगेच मी आता घातलेले कपडे घातले आणि पैशाचे पाकीट घेऊन निघालो. पोलिसांना सांगून मी सोबत काही कार्यकर्त्यांना घेऊन रिक्षामध्ये निघालो.
> रस्त्यात मी राजस्थानच्या गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना संपर्क केला त्यांनी कोणतेही पथक निघाले नसल्याचे सांगितले. मी त्यानंतर लगेच लोकेशन ट्रेस होऊ नये म्हणून सगळे फोन स्विच ऑफ केले.
> एका घरात जाऊन मी वकिलांना आणि तज्ज्ञांना संपर्क केले तेव्हा त्यांनी जयपूरमध्ये न्यायालयासमोर शरणागती पत्कारण्याचा सल्ला दिला.
> जयपूरला जाण्यासाठी मी रिक्षाने एअरपोर्टकडे निघालो, पण मला श्वास घेण्यास त्रास सुरू झाला त्यानंतर मी बेशुद्ध झालो, नंतर काय झाले मला काहीही कळले नाही.
> रात्री 12 च्या दरम्यान मी शुद्धीत आलो, तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये असल्याचे माझ्या लक्षात आले.
> मी गुन्हेगार नाही, पण माझ्या घराच्या, कार्यालयाच्या तपासणीचे प्रयत्न का केले जात आहेत.




