
आकाश पडघन
वाशिम-दि.२१ : 1 जानेवारी शौर्यदिनी भीमा कोरेगावत दंगल घडविणाऱ्या संभाजी उर्फ मनोहर भिडेसह मिलिंद एकबोटेला अटक करा आणि बहुजन समाजातील निरपराध तरुणावरील 395 प्रमाणे नोंदविलेले गुन्हे त्वरित मागे घ्या या मागणीला घेऊन शनिवार 20 जानेवारीला भारिपचे जिल्हाध्यक्ष युसुफभाई पुंजानी यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात कारंजा नगरपरिषद अध्यक्ष शेषराव ढोके ,डॉ.नरेश इंगळे ,विजय मनवर ,मधुकरराव जुमडे, ऍड.पी.पी.अंभोरे, सुभाष बोरकर,माणिकराव सोनोने,गजानन भोयर(संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष),संजय वैरागडे(अध्यक्ष मातंग समाज),परमेश्वर अंभोरे(सत्यमेव जयते फाऊंडेशन), ऍड.सचिन पट्टेबहादुर(भिम आर्मी),यांच्यासह सर्व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.तसेच आंदोलनामध्ये मराठा समाज, संभाजी ब्रिगेड, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सोशल ऍक्टिवा फोरम, तेली समाज , आदिवासी समाज, मुस्लीम समाजसह सर्व पुरोगामी संघटनांचा पाठिंबा मिळाला होता.





