रथयात्रा उत्सव २२ जानेवारीपासून

0
11

चिमूर,दि.20 : येथील प्रसिद्ध ऐतिहासिक घोडा रथयात्रा २२ जानेवारीपासून उत्सवाला प्रारंभ होत असून २९ जानेवारीच्या रात्री भव्य मिरवणुकीसह घोडा रथ यात्रा व १ फेब्रुवारीला गोपाल कालाचे आयोजन करण्यात आले असून, श्रीहरी बालाजी मंदिराच्या प्रांगणात आमदार किर्तीकुमार भांगडीयाच्या माध्यमातून दरवर्षी उत्सवात वेगवेगळया प्रसिद्ध मंदिराची प्रतिकृती उभारल्या जाते यंदा कलकता येथील प्रसिद्ध दक्षिणेशवरी काली माता मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे.

श्रीहरी बालाजी महाराज च्या घोडा रथ यात्रेत दरवर्षी प्रमाने यंदाही  आमदार किर्तीकुमार भांगडीया यांच्या पुढाकारातून अगोदर सोमनाथ,जगनाथ पुरी, तिरुपती बालाजी, पंढरपूर असे प्रसिद्ध मंदिराची प्रतिकृती साकारल्या गेली होती यंदा कलकत्ता येथील प्रसिद्ध काली माता मंदिराची प्रतिकृती मंदिर साकारल्या जात आहे. चिमूर येथील आराध्य दैवत श्रीहरी बालाजी देवस्थानचे विकास कामासाठी या अगोदर एकाही लोकप्रतिनिधींनी निधी दिला नव्हता. परंतु  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री व पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व पर्यटन मंत्री जयप्रकाश रावल यांच्या सहकार्यातून  आमदार किर्तीकुमार भांगडीया यांनी १५ कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित केला. त्यापैकी पर्यटन विभागाकडून ५ कोटी निधी मंजूर केले आणि कामास प्रारंभ झाले आहे. त्यात मोठे सभागृह ,सौदरी करण व इतर विकास कामे प्रस्तावित आहे.

घोडा रथ यात्रेत जास्तीत जास्त भक्तगण तथा जनतेनी सहभागी होण्याचे आवाहन श्रीहरी बालाजी देवस्थानचे अध्यक्ष नीलम राचल वार,अॅड चंद्रकांत भोपे, अॅड बबनराव बोथले, सुरेश पाटील डाहूले, डॉ. दीपक यावले, डॉ. मंगेश भलमे यांनी केले असून यात्रेत विशेष सहकार्य करणारे बालाजी भक्त मंडळाचे अध्यक्ष शुभम भोपे, सचिव गुणवंत चटपकर, गोपाल सिरास, नैणेश पटेल, हरीश अगडे, वैभव पेडके, सतीश ठाकूर, रक्षक हरणे, अरविंद गोठे, रामदास हेमके आदी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केले आहे.श्रीहरी बालाजी महाराज देवस्थान च्या यात्रेत ज्या भाविक भक्तांना सेवा बारा दिवस द्यायची असल्यास मंदिरात नोंद करण्याचे आवाहन सुद्धा करण्यात आले आहे.