39.8 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ अनुसूचित जमाती कल्याण समितीचा पालकमंत्र्यांनी केला सत्कार

अनुसूचित जमाती कल्याण समितीचा पालकमंत्र्यांनी केला सत्कार

0
50

blank

गोंदिया दि.२१ : : जिल्ह्यात १८ जानेवारीपासून अनुसूचित जमाती कल्याण समितीचा तीन दिवसीय दौरा झाला. आ.डॉ.अशोक उईके यांच्या अध्यक्षतेखाली १५ आमदारांची व अधिकाºयांच्या समितीने जिल्ह्याचा दौरा करून प्रत्येक विभागाच्या अनुसूचित जमातीशी संबंधित विकास कामांचा व कल्याणकारी योजनाच्या अंमलबजावणीचा आढावा घेवून विविध ठिकाणी भेटी देवून लाभार्थ्यांशी संवाद साधला. जिल्ह्यात आलेल्या या समितीचे राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी २० जानेवारी रोजी स्थानिक विश्रामगृहात आयोजित कार्यक्रमात सत्कार केला.
यावेळी त्यांनी, या समितीच्या दौºयामुळे अनुसूचित जमातीचे निश्चितच कल्याण होईल, असा विश्वास व्यक्त  केला. अध्यक्ष आ. डॉ. अशोक उईके यांनी, समितीने आपले कार्य पार पाडले असून येत्या काही दिवसात निश्चित चांगले बदल घडून येणार असल्याचे सांगितले. याप्रसंगी पालकमंत्री बडोले यांच्या हस्ते, आ. डॉ. अशोक उईके, समितीचे सदस्य आ. संजय पुराम, आ. श्रीकांत देशपांडे,आ. प्रभूदास भिलावेकर, आ. पास्कल धनारे, आ. शांताराम मोरे, आ. अमित घोडा, आ. डॉ. संतोष टारफे, आ. वैभव पिचड यांचा शाल, श्रीफळ  व स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन जयंत शुक्ला यांनी केले. तर आभार माजी जि.प.उपाध्यक्ष रचनाताई गहाणे यांनी मानले. यावेळी जि.प.सभापती छायाताई दसरे, जिल्हा महामंत्री लायकराम भेंडारकर, ओबीसी आघाडी प्रदेश सदस्य चामेश्वर गहाणे, भाजपा शहर अध्यक्ष सुनील केलनका, नगर सेवक भरत क्षत्रीय, अनु.जाती जिल्हाध्यक्ष रतन वासनिक, जिल्हा सचिव प्रदिपसिंग ठाकूर, सडक अर्जुनी पं.स.सभापती एकनाथ हत्तीमारे, उपसभापती राजेश कठाणे, रघुनाथ लांजेवार, केवलराम पुस्तोडे, माजी सभापती कविता रंगारी, जि.प.सदस्य शिलाताई चव्हाण, माधुरीताई पातोडे, धनंजय वैद्य, भोजराम नाकाडे, वसंत गणवीर, संदिप कापगते, मिलिंद बागडे, श्याम चौरे आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

blank