भिमा कोरेगाव हल्लेखोर अटकेसाठी बिलोलीत बैठकीचे आयोजन 

0
9
नांदेड ( सय्यद  रियाज )दि.२१ :  बिलोली शहर व ग्रामीण भागातिल सर्व सामाजिक संघटनेची व आंबेडकरी अनुयायांच्या महत्वपुर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी शासकीय विश्रामगृह बिलोली येथे 12 वाजता उपस्थित राहण्याचे समाजबांधवान आवाहन करण्यात आले आहे. 1 जानेवारी रोजी भिमा कोरेगाव येथे आंबेडकरी जनता दरवर्षी प्रमाणे या वर्षी शोर्यदिनाला दोनशे वर्ष पुर्ण होत सल्याने  पुर्वजांना मानवंदना देण्यासाठी लाखोंचा भिमसागर उसळला होता.तेव्हा जातिवाद्यांनी कट रचुन हल्ला केला. भिमा कोरेगाव येथे आंबेडकरी अनुयायावर भ्याड हल्ला  होऊन 20 दिवस ऊलटले तरीही अजूनही संभाजी  भिडे व मिलींद एकबोटे या मुख्यसुत्रधाराला अटक करण्यात आली नाही. महाराष्ट्र बंदच्या आंदोलनात या जातिवादी सरकारने आंबेडकरी अनुयायावर गुन्हे दाखल केले. तरी आंबेडकरी अनुयायांची या संदर्भात पुढील वाटचालीसाठी रविवार आज 21 जानेवारी रोजी वेळ 12 वा.शासकीय विश्रामगृह बिलोली( जि.नांदेड) येथे सर्व सामाजिक संघटनेच्या पदाधिकार्यांनी व आंबेडकरी अनुयायांनी उपस्थित रहावे आसे आवाहन आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते भास्कर भेदेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कले आहे.