37.9 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home राजकीय कांग्रेस-भाजप एकाच नाण्याचे दोन बाजू-विश्वास राऊत

कांग्रेस-भाजप एकाच नाण्याचे दोन बाजू-विश्वास राऊत

0
24

blank

एकोडी,दि.१३: तिरोडा विाधानसभा क्षेत्र बहुजन पक्षाच्यावतीने तिरोडा येथील शहीद गोवारी स्मारक येथे आयोजित पक्षाच्या बैठकीत बसपा प्रदेश सचिव विश्वास राऊत यांनी कांग्रेस व भाजप एकाच नाण्याचे दोन बाजू असून एकमेकांच्या योजनांची नावे बदलून काम करीत असल्याचा आरोप केला.
या पक्षांच्या विरोधात जनमानसात आक्रोश असून पक्षाच्या पदाधिकारी कार्यकत्र्यांनी प्रत्येक घरापयंत बहुजन समाज पक्ष पोहोविण्याचे वेळ असल्याचे विचार व्यक्त केले. सध्याचे सरकार धार्मिक दंगली घडविणे. उन्मात परसविणे आदि सारखे काम करीत असून सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी आत्महत्या करु लागला आहे.
शासकीय नौकèयाचे खासगीकरण करण्याचा घाट सरकारने रचला आहे. या विरोधात जनमानसात जागृती करण्याचे आवाहन केले. यावेळी जिल्हाध्यक्ष पंकज वासनिक, कमल हटवार, दिनेश गेडाम, भीमराव साखरे, महासचिव धुर्वास भोयर, किरणकुमार मेश्राम, दिनेश रोकडे, आनंद मेश्राम, निलेश रोडगे, अशोक बावणे, शैलेष उके, पंकय मेश्राम, संजय चौरे, निलेश उके आदी कार्यकर्ता उपस्थित होते.

blank