23.7 C
Gondiā
Sunday, August 30, 2026
Home विदर्भ तुमसर नप सभापतींची निवडणूक अविरोध

तुमसर नप सभापतींची निवडणूक अविरोध

0
36

तुमसर,दि.16ः-तुमसर नगर परिषदेची गुरुवारी (दि.१५) घेण्यात आलेली सभापती पदाची निवडणूक अविरोध पार पडली.नगरपरिषद सभागृहात पीठासीन अधिकारी उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाने, मुख्याधिकारी, नगराध्यक्ष प्रदीप पडोळे यांच्या उपस्थितीत सभापती पदाची निवडणूक घेण्यात आली.
यावेळी बांधकाम समिती सभापती म्हणून सुनील पारधी, शिक्षण समिती सभापती किरणदेवी जोशी, पाणीपुरवठा समिती सभापती पंकज बालपांडे, आरोग्य समिती सभापती उपाध्यक्ष कांचन कोडवानी, नियोजन व विकास समिती सभापती राजू गायधने, महिला बालकल्याण समिती सभापती ताराबाईगभणे, उपसभापती भारती धार्मिक, स्थायी समितीमध्ये रजनिश लांजेवार, शिला डोये, राकेश ठाकूर यांची निवड करण्यात आली.