वारकरी संप्रदायाने सामाजिक समतेचा मंत्र दिला-परिसंवादातील सूर

0
30

अर्जुनी मोरगाव(गोंदिया),दि.१६)संत चोखोबा नगरी येथे आयोजित ७ व्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य समेंलनाच्या पहिल्या दिवसातील महाराष्ट्रातील संतपरंपरा या विषयावरील परिसवांदात महाराष्ट्राला सातशे वर्षापुर्वीची संत वारकरी परंपरा लाभली आहे.या महाराष्ट्राच्या भूमीत अनेक संतानी जनजागृतीचे ,जनकल्याणाचे थोर कार्य केले आहे.सतकृपा आली-इमारत फला आली असे म्हटले जाते.या संताचे महत्व विशद करणाèया महाराष्ट्रातील संत परंपरा या विषयावर आयोजित परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी संत एकनाथांचे वशंज हभप प्रविणमहाराज गोसावी होते.वारकरी साहित्य परिषद व डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान नागपूर यांच्या सयुंक्त विद्यमाने या परिसवांदाचे आयोजन करणत आले होते.परिसवांदाचे अध्यक्ष हभप प्रविणमहाराज गोसावी म्हणाले की,या समेंलन स्थळाला संत चोखोबाचे नाव दिले ही अत्यंत आनंदाची बाब आहे.कारण चोखाबा या नावातच चोख हा शब्द आला आहे.चोख म्हणजे शुध्द विचार-ज्यांच शुध्द आचार विचार असतात हे खèया अर्थाने संत असतात.परमार्गात प्रत्येकांने चोख राहिले पाहिजे.व्यक्ती कोणत्या कुळात,धर्मात,वंशात जन्माला आळा याला महत्व नाही तर त्याची आचार व विचार सरणीशुध्द असली पाहिजे.तुळळी माळ गळा,हृद्यशी अश कळवळा ही संताची निती असते.जो दुसèयांना आपल्या हृदयांत स्थान देतो,ज्यांनी जातीपातीच्या qभती दूर केल्या,जातीयता दूर करण्याचे काम केले ते खरे संत होय.साधू जो ज्ञानाचा ईश्वर आहे तो ज्ञानेश्वर,या संत ज्ञानेश्वरांना ज्ञान देण्याचे काम संत मुक्ताईने केले.नामस्मरण व किर्तन ही संत नामदेवांनी जगाला दिलेली देणगी आहे.संत समाजासाठी इटतात,ते राजकारण्यासांठी नाहीत तर समाजाच्या उत्थानासाठी जन्माला आले असे विचार डॉ.सय्यद जब्बार पटेल यांनी व्यक्त केले.वारकरी कुठल्याही जात,पात,धर्माचा नसतो,तो जातपात पाळत नाही.कपाळावर टिळा लावून ,गळ्यात तुळशीमाळ घालूण माणसाचा तिरस्कार करणारी व्यक्ती वारकरी होऊ शकत नाही.महाराष्ट्राला ज्ञानेश्वर,तुकाराम,नामदेव,एकनाथ,निवृत्ती यांची पंथपरंपरा लाभली आहे.भगवंताकडे चांगला वाईट असा भेद असू शकतो मात्र संत भेदभावाच्या पलिकडे असतात.संत नामदेवांनी ७०० वर्षापुर्वी पंढरपूरात भरललेया संत समेंलनाची जबाबदारी संत जनाबाईकडे सोपविली होती.नगराच्या निर्मितीसाठी प्रथम जलाशयाची निर्मिती करावी व जलाच्या निर्मितीसाठी महावनांची निर्मिती करावी हे ज्ञानश्वरांनी पर्यावरणासाठी ७०० वर्षापुर्वी सांगितले.डॉ.आंबेडकरांनी लिहिलेली राज्यघटना वारकरी संप्रदायाच्या समता,स्वातंत्र्य,बंधुता या तत्वाच मुळावर आधारीत समानतेच तत्वाशी निगडीत आहे असे मौलिक विचार हभप श्यामसुंदर सोनार यांनी मांडले.तर हभप डॉ.तुळशीराम गुट्टे यांनी महाराष्ट्रात संत या शब्दाचा उच्चार प्रथमतः संत मुक्ताईने केला.योगी पावन मनाचा साही अपराध जनाचा.संत विन्रम असतात.शांत,सौम्य,निराकार,प्रवृती संताची असते.संत परंपरेत संताची परिक्षा घेण्याचे काम मुक्ताईने केल.मुक्ताबाई करारी बाण्याची होती-मात्र तिचा दृष्टीकोन परिवर्तनवादी होता.समाजाला नैतिकतेचा पाठबळ देणारा तो वारकरी संप्रदाय आहे.दया,क्षमा,शांती अंगी,तोची असे संत विठ्ठल नामाचा महिमा अगाध आहे.१०८ वेळा विठ्ठलाचे नाव उच्चाठल्यास वैज्ञानिक दृष्टीने हार्टअटक येत नाही असे सिध्द झाले आहे.अशा प्रकारचे विचार परिसंवादातील विचारवंतानी व्यक्त केले.संचालन व आभार डॉ.भारत राठोड यांनी मानले.