32.7 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home राजकीय शिवसेनाही परळी मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवणार

शिवसेनाही परळी मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवणार

0
35

blank

बीड,दि.22(विशेष प्रतिनिधी)- परळी विधानसभेची निवडणूक शिवसेना लढणार आहे. निवडणूक लढवण्याचा आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. ‘मातोश्री’वरुन हाच संदेश घेऊन मी आलो आहे, असे शिवसेनेचे देगलूरचे आमदार सुभाष साबणे यांनी म्हटले आहे.शिवसेनेच्या या घोषणेनंतर ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे विरुद्ध विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची ही लढत आता तिरंगी होईल, अशी चिन्हे दिसू लागली आहेत. परळी हा महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांचा मतदारसंघ आहे. धनंजय मुंडे याच मतदारसंघातून निवडणूक लढवण्याच्या मुद्द्यावरुन भाजपमधून बाहेर पडले होते. तेव्हापासूनच या मतदारसंघात भाऊ-बहिणीत मोठी लढत पाहायला मिळते. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली निधनानंतर गेल्या निवडणुकीत शिवसेनेने परळी मतदारसंघातून उमेदवार उभा केला नव्हता.

blank