24.5 C
Gondiā
Friday, August 21, 2026
Home राष्ट्रीय देश दत्तक कायद्यात शिथिलता आणावी : पंकजा मुंडे

दत्तक कायद्यात शिथिलता आणावी : पंकजा मुंडे

0
30

नवी दिल्ली,दि.24: राज्यात मुले-मुली दत्तक घेणाऱ्‍यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, नियम अधिक कडक असल्यामुळे दत्तक घेण्यास अधिक वेळ लागत लागतो. त्यामुळे दत्तक घेणाऱ्‍या पालकांना बराच काळ वाट पाहावी लागते, त्यामुळे या नियमात शिथिलता आणावी, अशी मागणी माहिला व बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्री मनेका गांधी यांच्याकडे केली.
शास्त्री भवनात केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्री यांच्या कक्षात श्रीमती मुंडे यांनी भेट घेतली. यावेळी केंद्रीय महिला व बाल कल्याण सचिव राकेश श्रीवास्तव आणि राज्याच्या महिला व बाल विकासाच्या सचिव विनिता वेद यावेळी उपस्थित होत्या. बैठकीनंतर श्रीमती पंकजा मुंडे यांनी माहिती दिली.
दत्तक देण्यासंदर्भातील कायद्यांमध्ये अधिक गती देण्यासंदर्भातील केंद्रीय मंत्री श्रीमती मनेका गांधी यांनी केलेल्या सूचनांवर राज्य शासन लवकरच कार्यवाही करेल, असे श्रीमती मुंडे यांनी सांगितले. राज्यातील काही भागात कुपोषणाचे प्रमाण आहे, कुपोषित बालकांना पोषण आहार देऊन हे प्रमाण कमी करण्याचे कार्य राज्य शासन करीत असल्याचे श्रीमती मुंडे यांनी श्रीमती गांधी यांना सांगितले.
अनाथांना आरक्षण देण्याचे कौतुक
राज्य सरकाराने अनाथांना आरक्षण देण्याचा निर्णय नुकताच घेतलेला आहे. यासंदर्भातील सविस्तर माहिती श्रीमती पंकजा मुंडे यांनी श्रीमती मनेका गांधींनी यांना दिली. या निर्णयाचे कौतुक श्रीमती गांधी यांनी यावेळी केले. यासह राज्यात राबविण्यात येणाऱ्‍या मातृत्व वंदन योजना, माझी कन्या भाग्यश्री, बेटी बचाओं बेटी पढाओं योजनांची माहिती श्रीमती मुंडे यांनी यावेळी दिली. मुलींसाठी सुरू झालेल्या अस्मिता योजनेची माहितीही दिली असल्याचे श्रीमती मुंडेनी सांगितले.