गोंदिया-समनापूर मार्गावर लवकरच धावणार रेल्वे

0
13

गोंदिया,दि.24 :  गोंदिया ते समनापूर या रेल्वे लाईनचे निरीक्षण शुक्रवारी (दि.२३) रेल्वेचे डीआरएम अमितकुमार अग्रवाल व मंडळ वाणिज्य व्यवस्थापक अर्जुन सिबल यांनी केले. त्यामुळे गोंदिया रेल्वे स्थानकातून समनापूरसाठी लवकरच गाडी सुरू करण्यात येईल. दररोज तीन फेऱ्या होणार असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. तसेच त्यासाठी वेळापत्रकही तयार करण्यात आले आहे. मागील महिन्यातच बालाघाट ते समनापूरपर्यंत रेल्वे ट्रक टाकण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे.जवळपास सहा महिन्यांपूर्वी गोंदिया रेल्वे स्थानकावर एस्कलेटरचे (स्वयंचलित पायऱ्या) काम पूर्ण झाले आहे; मात्र अद्यापही एस्कलेटर प्रवासी सेवेसाठी उपलब्ध करून देण्यात आले नाही. याबाबत आता वजन ठेवून दोन महिन्यांपर्यंत एस्कलेटरची टेस्टिंग होणार असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. परिणामी या सेवेचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना अजून दोन महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे.
मागील काही वर्षांपासून गोंदिया रेल्वेस्थानकावर एस्कलेटर लावण्याची मागणी केली जात होती. विशेष म्हणजे पायºया चढणे व उतरण्यासाठी ज्या प्रवाशांना त्रास होत होता.सर्व प्रवासी एस्कलेटर सेवा सुरू होण्याची वाट पाहत होते. प्रवाशांची मागणी पाहून रेल्वे प्रशासनाने बांधकाम सुरू केले. काही कालावधीतच एस्कलेटरचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. परंतु बांधकाम होऊन सहा महिन्यांचा काळ लोटला तरी प्रवासी सेवेत ते उपलब्ध झाले नाही.
याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांची चौकशी केल्यावर त्यांनी सांगितले की, एस्कलेटरची दोन महिने सातत्याने टेस्टींग करण्यात येणार आहे. जपानचे काही अभियंता या कार्यात गुंतले होते. हे काम पूर्ण झाल्यावर एस्कलेटर सुरू होण्याची शक्यता होती. परंतु आता सुद्धा एस्कलेटरची टेस्टींग प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. आता वजन ठेवून एस्कलेटरची टेस्टींग करण्यात येणार आहे. या टेस्टिंगनंतरच एस्कलेटर प्रवासी सेवेसाठी उपलब्ध होवू शकेल. या टेस्टिंगसाठी आणखी दोन महिन्यांचा काळ लागू शकेल, असेही रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.