38.2 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home राजकीय शरद पवारांच्या भेटीसाठी अाशिष शेलार बारामतीत

शरद पवारांच्या भेटीसाठी अाशिष शेलार बारामतीत

0
25

blank

पुणे,दि.24(विशेष प्रतिनिधी)-केंद्र व राज्यात भाजपचे सरकार अाल्यापासून पंतप्रधान नरेंद्र माेदींसह भाजपच्या अनेक नेत्यांचा बारामतीत येऊन ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेण्याचा सुरू झालेला िसलसिला अजून थांबलेला नाही. मुंबई भाजपचे अध्यक्ष व अामदार अाशिष शेलार यांनी शुक्रवारी पवारांशी बारामतीत येऊन चर्चा केली. त्याचा तपशील मात्र दाेन्ही बाजूने गाेपनीय ठेवण्यात अाला. दरम्यान, भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांची व नेत्यांची भेट न घेताच शेलार मुंबईला परतले त्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांची मात्र निराशा झाली.अामदार शेलार हे मुंबई क्रिकेट असाेसिएशनचे अध्यक्षही अाहेत. या संघटनेत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या संमतीशिवाय पानही हलत नाही. शेलार यांची नियुक्तीही पवार यांच्या संमतीनेच झाल्याचे सांगितले जाते. शेलार व पवार यांची शुक्रवारची भेट ही राजकीय नसून मुंबई क्रिकेट असाेसिएशनच्या कामासंदर्भात हा दाैरा असावा, असा तर्क काढला जात अाहे. दरम्यान, शेलार यांनी बारामतीत नव्याने उभारण्यात अालेले भव्य स्टेडियम, विद्या प्रतिष्ठानचे शैक्षणिक संकुल व तेथील वस्तुसंग्रहालयाचीही पाहणी केली. माळेगावात पवार कुटुंबीयांच्या वतीने उभारण्यात अालेल्या अद्ययावत विज्ञान केंद्रालाही भेट देऊन शेलार यांनी तेथील कामाची पाहणी करून काैतुक केले.

blank