23.9 C
Gondiā
Wednesday, August 19, 2026
Home विदर्भ आरोग्य तपासणी व औषधी वाटप २६ फेब्रुवारीला

आरोग्य तपासणी व औषधी वाटप २६ फेब्रुवारीला

0
18
सडक अर्जुनी,दि.24 : तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नागरी क्र.१ येथे येत्या २६ फेब्रुवारीला स्व. वासुदेव लंजे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आरोग्य तपासणी शिबिर व गरजुंना मोफत औषधी वाटप करण्यात येणार आहे. तरी परिसरातील सर्व नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन दंतरोग तज्ञ डॉ. अश्विनी अशोक लंजे यांनी केले आहे. या शिबिरात हड्डीरोग तज्ञ डॉ. मनोज राऊत, मानसिक रोग डॉ. अजय बिरनवार, सिकलसेल, शुगर, नाळी प्रशिक्षण तथा असाध्य रोग प्रशिक्षक डॉ. नीरज गुप्ता, चर्मरोग, पथरी, पाठ, बवासीर, भंगदर तज्ञ डॉ. संकेत परशुरामकर, सलाहागार चिकित्सक डॉ. व्ही.एम. परशुरामकर उपस्थित राहणार आहेत.