23.4 C
Gondiā
Wednesday, August 12, 2026
Home Top News चकमकीत एक दहशतवादी ठार, कोम्बिंग ऑपरेशन सुरु

चकमकीत एक दहशतवादी ठार, कोम्बिंग ऑपरेशन सुरु

0
22

श्रीनगर,दि.01(वृत्तसंस्था) – जम्मू काश्मिरमधील बंदिपोरा येथे हाजीन क्षेत्रात आज सकाळी सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली. या चकमकीत जवानांनी एका दहशतवाद्याला ठार केलं असल्याची माहिती मिळाली आहे. जम्मू काश्मीर पोलिसांनी चकमक झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय जवानांनी दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी शकरुद्दीन गावात सकाळपासूनच कोम्बिंग ऑपरेशन सुरु केले आहे. जवानांना काही दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी ही कारवाई केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला हे फक्त सर्च ऑपरेशन होतं, पण दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केला आणि याचं चकमकीत रुपांतर झालं.

blank