25.1 C
Gondiā
Friday, August 14, 2026
Home गुन्हेवार्ता रुग्णासोबत वाद झाल्याने वैद्यकीय अधिकार्याची आत्महत्या?

रुग्णासोबत वाद झाल्याने वैद्यकीय अधिकार्याची आत्महत्या?

0
28

बुलडाणा , दि. २० :-  रुग्णाचे बोलणे सहन न झाल्याने शेगांव तालुक्यातील भोनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकार्याने आज मंगळवारी सकाळी आत्महत्या केल्याचे उघड झाले.भोनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत वैद्यकीय अधिकारी डॉ. धिरज प्रकाश जमादार (वय ३०) यांनी खामगाव-शेगाव रोडवरील रसिका धाब्याजवळ त्यांच्या घरात आत्महत्या केली. त्यांचा सोमवारी एका रुग्णासोबत वाद झाला होता. रुग्णाने त्यांना टॉनिक मागितले पण उपलब्ध नसल्याने गोळ्या देवू शकतो असे ते म्हणाले. त्यामुळे रुग्णासोबत त्यांचा वाद झाला. या सर्व प्रकाराचा त्यांना मानसिक त्रास झाल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनेचा तपास शेगाव पोलिस करीत आहेत.डॉक्टराने केलेल्या आत्महत्येत इतर दुसऱ्या कारणाचा सहभाग आहे का याचा शोध पोलीस घेत आहेत.
मृत्तक डॉक्टर धीरज यांचे लग्न सात महिन्यापूर्वी झाले होते.त्यांची पत्नी मध्यप्रदेशातील होशंगाबाद आपल्या माहेरी गेली होती डॉक्टरने आत्महत्या करण्या पूर्वी आपल्या मित्राला मेसेज टाकला व चिट्ठी ही लिहली होती.पोलीस सर्व प्रकरणाचा तपास करीत आहे.