24.7 C
Gondiā
Sunday, August 16, 2026
Home गुन्हेवार्ता गडचिरोली जिल्हा हिवताप अधिकारी पांडे एसीबीच्या जाळ्यात

गडचिरोली जिल्हा हिवताप अधिकारी पांडे एसीबीच्या जाळ्यात

0
34

गडचिरोली,दि.21 : गडचिरोलीचे जिल्हा हिवताप अधिकारी पांडे यांनी प्रवास भत्त्याचे देयके निकाली काढण्यासाठी ६ हजार ५०० रूपयांची लाच स्वीकारतांना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. हि कारवाई गडचिरोली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज बुधवारला केली. जिल्हा हिवताप अधिकारी शिवशंकर जगदंबाप्रसाद पांडे यांच्याकडे एका कर्मचाऱ्याने प्रवास भत्त्याची देयके मंजुरी करिता ठेवले  असता पांडे यांनी देयके मंजुर करण्याकरीता 10 हजाराची मागणी केली.परंतु तक्रारदारास रक्कम द्यायची इच्छा नसल्याने लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली.त्या तक्रारीच्या आधारे सापळा रचण्यात आले असता पांडे यांनी 10 हजाराएैवजी ६ हजार ५०० रुपयात तडजोड करीत ती स्विकारल्याने अटक करण्यात आली आहे.