24.1 C
Gondiā
Monday, August 17, 2026
Home विदर्भ सदस्याच्या आरोपानंतर तिरोडा पंचायत समितीची मासिक सभा स्थगित

सदस्याच्या आरोपानंतर तिरोडा पंचायत समितीची मासिक सभा स्थगित

0
23

तिरोडा,दि.22 : तिरोडा येथील पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता.त्यातच सभापती व उपसभापतीही राष्ट्रवादीचेच,सदस्यही अधिक राष्ट्रवादीचेच परंतु गेल्या दोन महिन्यापुर्वी झालेल्या सभापती उपसभापती निवडणुकीत दोन गटात विभागलेल्या राष्ट्रवादीचा खरा चेहरा 21 मार्चच्या पंचायत समितीच्या मासिक सभेत बघावयास मिळाला.राष्ट्रवादी काँग्रेसच्याच पंचायत समिती सदस्या असलेल्या संध्या गजभिये यांनी आपल्याच पक्षाच्या सभापती,उपसभापती व सदस्यावर शासकीय पैशाचा गैरवापर करीत गोवा व नेपाळची सहल केल्याचा आरोप केल्याने चांगलीच खळबळ माजली.श्रीमती गजभिये यांनी केलेल्या आरोपामुळे इतर सदस्यांनी सभा सुरु होताच गदारोळ सुरु करीत सदर सदस्यांने यासंबधीचे पुरावे सादर करावे ही मागणी रेठून धरली.जोपर्यंत पुरावे सादर करणार नाही,तोपर्यंत सभा न चालू देण्याचा निर्णय घेण्यात आला.

सभापती निता रहागंडाले व उपसभापती राऊत यांनी सर्व सदस्यांच्या भावना लक्षात घेत पंचायत समिती सदस्या संध्या गजभिये यांनी 23 मार्चरोजी सदर प्रकरणात कुठल्या शासकीय निधीचा खर्च करण्यात आला आहे,यासंबधीचे पुरावे सादर करावे अशा सुचना देत सभाच तहकुब केली.आता ही सभा 23 मार्चला होणार असून श्रीमती गजभिये पुरावे सादर करतात काय याकडे लक्ष लागले आहे.गजभिये यांनी शेष फंड व लोकवर्गणीचा वापर गोवा व नेपाळ सहलीकरीता करण्यात आल्याचा उल्लेख एका वृत्तपत्रात केला आहे.