24.7 C
Gondiā
Tuesday, August 18, 2026
Home विदर्भ देऊळगावनजीक खोब्रागडी नदीच्या काठावर जळाला धावता टेम्पो

देऊळगावनजीक खोब्रागडी नदीच्या काठावर जळाला धावता टेम्पो

0
30

गडचिरोली, दि.२३: आरमोरी येथून गडचिरोलीकडे अगरबत्ती घेऊन जाणारा टेम्पो रस्त्यात अचानक जळाल्याने खळबळ माजली. ही घटना आज दुपारी पावणेचार वाजताच्या सुमारास घडली. मात्र, यात कुठलीही जीवित हानी झाली नाही.महिंद्रा टेम्पोमधून अगरबत्त्या विक्रीसाठी नेण्यात येत होत्या. टेम्पो खोब्रागडी नदीलगतच्या रस्त्यावरुन धावत असतानाच अचानक आग लागली. काही क्षणातच आगीने रौद्ररुप धारण केले. यात टेम्पोसह संपूर्ण अगरबत्त्या जळून खाक झाल्या. मात्र प्रसंगावधान राखत चालक वाहनातून उतरल्याने तो बचावला. भर रस्त्यावरच वाहन जळत असल्याने काही काळ त्या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच आरमोरी पोलिस घटनास्थळी पोहचले.